मुरूम (प्रतिनिधी) -येथील बस स्थानकातील 40-50 वर्षांपासूनचे वडाचे झाड दि.26 मे रोजी झालेल्या वादळात जमीनदोस्त झाले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र शेजारीच असलेल्या श्री कपिलेश्वर कँटीनच्या पाठीमागील भागात झाड कोसळल्याने हॉटेलचे अंदाजित दीड-दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे दिसून येते. दि.26 मे रोजी अचानक आलेल्या वादळाने सदरील झाडाला घेरले आणि त्यातूनच ही झाड जमीनदोस्त झाली असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. वडाचे झाड आतील बाजूस पडल्याने सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र हॉटेल व्यवसायिकाचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल प्रशासनाने याची दखल घेऊन हॉटेल व्यवसायिकला पुन्हा हॉटेल उभारणीसाठी मदत करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.

 
Top