धाराशिव (प्रतिनिधी) -  धाराशिव तालुक्यातील दारफळ येथील श्री संत कोकणे बुवा वारकरी शिक्षण संस्थेच्या चौदाव्या वर्धापण दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास आज प्रारंभ झाला. कलश स्थापनेसह टाळ पूजन, प्रतिमा पूजन, मृदंग पूजन, वीणा पूजन, गाथा पूजन , ध्वज पूजन, ग्रंथ पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी योगेश बप्पा इंगळे महाराज, युवासेनेचे जिल्हा समन्वयक तथा दारफळचे सरपंच ॲड. संजय भोरे, संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र इंगळे, नरसिंह देशपांडे, अनिल जाधव, सुरेश भोरे, चंद्रकांत इंगळे, कमलाकर देशपांडे, उपेंद्र पाठक, गणेश डक, महेश इंगळे यांच्यासह राजकीय, अध्यात्मिक, सामाजिक आदी क्षेत्रातील दारफळ व पंचकृषीमधील मान्यवर व भाविक मोठया संख्येने उपस्थित होते. व्यासपीठ म्हणून हभप. श्रीनिवास गिरी हे आहेत. तर 09 मे 2024 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत हभप. पांडुरंग महाराज रेड्डी यांचे कीर्तन झाले. शुक्रवार ते बुधवार रोज रात्री सुप्रसिद्ध महाराजांची कीर्तने होणार असून भाविकांना कीर्तनाचा रोज रात्री 9 ते 11 या दरम्यान आस्वाद घेता येणार आहे. गुरुवार दिनांक 16 मे 2024 रोजी दिंडी प्रदक्षिणा होऊन 10 ते 12 या वेळेत हभप. प्रकाश महाराज साठे बीड यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे व त्या नंतर महाप्रसाद होणार आहे.


 
Top