तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील आपसिंगा येथे चाळीस दिवशीय चिमुकली मरण पावल्याची घटना रविवार दि. 19 मे रोजी घडली. या दुर्दवी घटनेच्या पार्श्वभूमीवर आपसिंगा गावात डीजे डाँल्बीस परवानगी देवु नये असे पञ पोलिस निरक्षक पोलिस स्टेशन तुळजापूर यांना ग्रामपंचायत आपसिंगा यांनी  दिले आहे. त्यामुळे चिमुकलीच्या दुर्देवी निधनाचा घटनेची दखल ग्रामपंचायत ने घेतल्याने ग्रामस्थांमधुन समाधान व्यक्त केले आहे.

पोलीस निरीक्षक  पो.स्टे.तुळजापूर यांना  सोमवार दि. 19 मे रोजी आपसिंगा ग्रामपंचायतने दिलेल्या पञात म्हटले आहे.  आपसिंगा ता. तुळजापूर जि. धाराशिव येथे खुप मोठया प्रमाणात सार्वजनीक कार्यक्रम होत असतात. त्यामध्ये मोठया प्रमाणात आपसिंगा गावमध्ये डि.जे. डॉल्बी लावण्याचे खुप प्रमाण

वाढले आहे. त्या डि.जे. डॉल्बीचा खुप मोठा आवाज असतो. त्यामुळे गावातील लहान मुले व वयोवृध्द लोकांना खुप मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे येथुन आपसिंगा गावामध्ये डि.जे. डॉल्बीला परवानगी देवू नये. असे विनंती करणारे पञ सरपंच अजित क्षिरसागर यांच्या मार्गदर्शन दिले.

या वाढत्या आवाजाची दखल बंदोबस्तास असलेल्या पोलिसांनी घेतली का नाही याची चर्चा सर्वञ होत आहे.

 
Top