धाराशिव (प्रतिनिधी)-अखिल शिक्षक संघाच्या दिनांक 15 मे 2024 रोजी जिल्हा शाखेच्या बैठकीत जिल्हा उपाध्यपदी मालोजी तुकाराम वाघमारे यांची एकमताने निवड करण्यात आली. मालोजी वाघमारे यांचे शिक्षकांच्या प्रश्नाची जाण व सोडवण्याची तळमळ पाहता त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नुकतेच त्यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या धाराशिव तालुका सचिव पदाचा राजीनामा देऊन अखिल शिक्षक संघामद्ये प्रवेश केला होता. सद्या ते अल्पसंख्यांक शिक्षक पतसंस्थेचे  व्हा. चेअरमन  आहेत. अखिल शिक्षक संघांचे राज्य उपाद्यक्ष श्री लालासाहेब मगर व राज्यकार्यकारिणी सदस्य श्री बशीर तांबोळी यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, अविनाश मोकाशे यांच्या उपस्थितीत सदर निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी महेबूब काझी, बिलाल सौदागर, मिलिंद धावारे,नागनाथ मुडबे, सचिन टाकपीरे, जगदीश जागते,राजेंद्र अकोस्कर, इलाही बागवान, श्रीहरी बिडवे, मोहन लस्करे, संतोष डोके, बाबासाहेब चौरे उपस्थित होते.

 
Top