तुळजापूर (प्रतिनिधी) -  मंगळवार पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे नियोजन कोलमडल्याचे दिसुन आले.

मंगळवार पहाटे एक वाजता चरणतिर्थ होवुन धर्म दर्शनास आरंभ झाला. तेव्हा पासुन भाविकांचा ओघ सुरु होता. तो  राञी पर्यत कायम होता. आज दिवसभर धर्म, मुख, अभिषेक सशुल्क दर्शन  रांगा भाविकांनी भरभरून वाहिल्या. देवीदर्शनानंतर भाविकांनी बाजारपेठेत गर्दी केल्याने बाजार पेठ भाविकांनी फुलुन गेली होती. भाविकांना अतिक्रमण वाहातुक कोंडी स्नान करण्यासाठी लागत असलेला वेळ याचा ञास सहन करावा लागला. असाह्य उकाड्यात घामांचा धारेत भाविकांनी श्रीतुळजाभवानी दर्शन घ्यावे लागले.

 
Top