धाराशिव (प्रतिनिधी)- फरार आरोपीचा शोध घेवून मालाविषयक गुन्हे उघड करण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस पथक कळंब भागात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळस त्यांना कळंब तालुक्यातील शेळका धानोरा येथे एक इसम पिस्तुलसारखे शस्त्र बाळगत असल्याची माहिती मिळाली. पथकाने 1 मे रोजी सायंकाळी सदर इमसाच्या घरावर धाड मारली असता देश बनावटीचे पिस्तुलसह 3 राऊड असा एकूण 25 हजार 900 रूपये किंमतीचा मुद्देमाल पकडला. 

स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने कळंब तालुक्यातील शेळका धानोरा येथील इसम शरद विठ्ठल पवार  हा त्याचे राहते घरी  पिस्टल सारखे शस्त्र कब्जात बाळगुन आहे. अशी खात्रीलायक बातमी  मिळाल्याने  पथकाने दि. 01.05.2024 रोजी सांयकाळी सदर ठिकाणी गेले असता मिळालेल्या बातमी प्रमाणे एक इसम मिळून आला. पथकाने सदर इसमास त्याने त्याचे नाव- शरद विठ्ठल पवार, वय 25 वर्षे, रा. शेळका धानोरा ता. कळंब जि. धाराशिव असे सांगीतले. याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात देशी बनावटीचे पिस्टल सह 03 राउंड असा एकुण अंदाजे 25 हजार 900 रूपये किंमतीचा मुददेमाल मिळुन आला. यावर पथकाने त्यास अटक करुन त्याच्या ताब्यातील नमूद पिस्टल व राउंड हे जप्त करुन त्याच्याविरुध्द कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक, अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक, गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस अंमलदार वल्लीवुल्ला काझी, शौकत पठाण, जावेद काझी, प्रकाश औताडे, फरहान पठाण, शैला टेळे, चालक रत्नदिप डोंगरे यांच्या पथकाने केली आहे.


 
Top