धाराशिव (प्रतिनिधी)- उमेदवार असलेल्या ओमराजे निंबाळकर यांच्या परिवारातील सर्वच महिलांनी आपल्या सदस्यास निवडुन आणण्यासाठी प्रचाराच्या मैदानात उडी घेतल्याचे दिसत आहे. कैलास पाटील यांच्या पत्नी यांनी देखील गावा-गावात जाऊन प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसत आहे.

मतदारसंघात एका बाजुला ओमराजे निंबाळकर यांच्या सभांचा धुरळा उडत आहे. तर दुसरीकडे त्यांच्या परिवारातील महिला देखील डोअर टु डोअर फिरुन मतदान करण्याचे आवाहन करताना दिसत आहेत. त्यामध्ये पत्नी संयोजिनीराजे, आई आनंदीदेवी, बहिण डॉ. सईदेवी, वहिणी देविका यांनी प्रचारात रंग भरल्याचे दिसुन येत आहे. त्याना महिला वर्गातुनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

तेव्हा अनेकाकडुन खासदारानी गावासाठी काय केले. फोनवरुन कसे काम केले हे सांगितले जात आहे. त्याचबरोबर कैलास पाटील यांच्या पत्नी शुभांगी यानी सुध्दा कळंब- धाराशिव तालुका पिंजुन काढला आहे. गावागावात त्यांचे अत्यंत उत्साहाने स्वागत होत असुन आमदाराच्या पत्नी असल्या तरी सर्व सामान्य महिला वर्गात प्रचार कार्यात झोकून घेतले आहे. महिलाशक्ती ही खंबीरपणे आपल्या माणसाच्या मागे उभा राहते तेव्हा त्याचा किती चांगला परिणाम दिसतो याचे हे अत्यंत चांगले उदाहरण आहे. 


 
Top