धाराशिव (प्रतिनिधी)- उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघांतर्गत येत असलेल्या सर्व सहा विधानसभा मतदारसंघातील 85 वर्षावरील व दिव्यांग मतदारांना 2 ते 5 मे दरम्यान घरूनच मतदान करता येणार आहे.अशा ज्या मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे घरून मतदान करण्यासाठी अर्ज सादर केले आहे,अशा मतदारांना पोस्टल मतपत्रिका पध्दतीने गृहभेटीत मतदान करता येणार आहे.

औसा विधानसभा मतदारसंघात वय वर्षे 85 पेक्षा जास्त असणारी 181 मतदार आणि 46 दिव्यांग मतदार अशी एकूण 227 मतदार, उमरगा विधानसभा क्षेत्रात 85 वर्षापेक्षा जास्त 604 मतदार तर 332 दिव्यांग मतदार असे एकूण 936 मतदार, तुळजापूर विधानसभा क्षेत्रात 85 वर्षापेक्षा जास्त असणारे 616 मतदार आणि 118 दिव्यांग मतदार अशी एकूण 734 मतदार, उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात 85 वर्षपेक्षा जास्त असणारे 991 मतदार आणि 160 दिव्यांग मतदार असे एकूण 1151 मतदार,परंडा विधानसभा क्षेत्रात 85 वर्षापेक्षा जास्त असणारे 914 वयस्क मतदार आणि 171 दिव्यांग मतदार असे एकूण 1085 मतदार आणि बार्शी विधानसभा क्षेत्रात 85 वर्षापेक्षा जास्त असलेले 236 वयस्क मतदार आणि 24 दिव्यांग मतदार असे एकूण 260 मतदारांचा समावेश आहे.उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रातील 3542 मतदार हे वय वर्ष 85 पेक्षा जास्त आणि 851 दिव्यांग मतदार असे एकूण 4393 मतदार घरीच आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे.


 
Top