भूम  - वारकरी संतांनी आपल्या अभंगातून बंधुता , मानवता व समतेचा विचार सांगितला, हा विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम चोखपणे " चोखोबा ते तुकोबा-  एक वारी समतेची " करत आहे, ही एक चांगली गोष्ट आहे, पंढरपूरच्या वाळवंटात सर्व जाती पंथाचे लोक एकत्र येत असत , तत्कालीन काळापासून पंढरपूरच्या चंद्रभागेच्या तिरी वाळवंटात ' सामाजिक लोकशाहीची ' मुहूर्तमेढ वारकरी संतांनी केली , पंढरपूर चे वाळवंट हे सामाजिक लोकशाही अन मानवतावादाचे लोक विद्यापीठ आहे , वारकरी संतानी आपल्या कृतीशील आचरनाद्वारे सांगितलेंला समता अन बंधुभावाचा विचार घेउन निघणारी ' समता वारी ' दुरवर्षी सर्वस्पर्शी समाज हिताची आहे, सामाजिक विण घट्टट करण्याचे कार्य  समता वारी उपक्रमाद्वारे घडु पाहत आहे . असे प्रतिपादन महंत धर्मदास महाराज सामनगावकर यांनी केले  , समता वारी २०२४ची चित्रमय कार्य अहवाल पुस्तिका ' समता दर्शन ' च्या प्रकाशन प्रसंगी केले .


समाज माध्यमातून जात, धर्म , पंथ' च्या नावे होत असलेला विद्वेशी  प्रचार थांबून तरुण मंडळींना सकारात्मक विचार देण्यासाठी, रचनात्मक कार्यास प्रेरित करुन राष्ट्र उभारणीच्या कार्यात त्यांचा हातभार लागला पाहिजे, या हेतूने संत चोखामेळा अध्यासन केंद्र व वृंदावन फाऊंडेशन यांच्या वतीने ही वारी मागील ६ वर्षांपासून निघत आहे. चोखोबा ते तुकोबा एक वारी समतेची २०२४ च्या चित्रमय कार्य अहवाल पुस्तिका 'समता दर्शन' ही दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन समता वारी संयोजन समितीच्या अध्यक्षा प्रा अलका सपकाळ यांनी केले.  सध्या समाजाला संतांच्या विचारांची गरज आहे. दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशी प्रवृत्ती वाढत आहेत त्यामुळे माणसाची मन जोडण्याचा विचार घेऊन निघालेल्या समता वारीच्या विचारांची समाजाला गरज आहे  असे पुढे बोलतांना महंत हभप धर्मराज महाराज सामनगावकर यांनी सांगितले.


श्री सदगुरु श्यामनाथ महाराज गुरुपीठ सामनगाव ता. भूम  येथे 'समता दर्शन' या चित्रमय समतावारी पुस्तिकेचे अहवाल  प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी समता वारीचे निमंत्रक सचिन पाटील, प्रा. ज्ञानोबा सपकाळ,  महारुद्र जाधव आदी उपस्थित होते . कार्यक्रमास स्थानिक भक्त परिवार उपस्थित होता .

 
Top