प्रियंका हंगरगेकर व यश हुंडेकरीची राज्य संघात निवड


तुळजापूर -

सांगली येथे झालेल्या  बाराव्या राजस्तरीय साँफ्ट  टेनिस  स्पर्धेत  धाराशिव जिल्हयाने  नेत्रदिपक कामगिरी करीत  ऐक गोल्ड तीन रजत दोन कास्य पदक पटकावले.  या स्पर्धत मुलांचा ३८व मुलीच्या ३०जिल्हा संघानी सहभाग घेतला होता.

धाराशिव जिल्हयाकडून   खेळताना मुलींच्या ऐकरी स्पर्धत कु प्रियंका किरण हंगरगेकर हिने गोल्ड मेडल पटकावले तर मुलींच्या दुहेरी स्पर्धत प्रेरणा देशमुख व प्रियंका हंगरगेकर यांनी रजत पदक प्राप्त केले तसेच मुलींच्या सांधीक संघाला कास्य पदक मिळाले या संघात प्रियंका हंगरगेकर प्रेरणा देशमुख गायञी केवटे यांचा समावेश होता. मुलांच्या ऐकरी स्पर्धत यश हुंडेकरी याने कास्य पदक तर मुलांच्या सांघीक संघाने रजत पदक प्राप्त केले.या संघात यश हुंडेकरी किरण खंडाळकर संजय नांगरे सुयश आडे आदित्य सापते स्वराज्य देशमुख सुरज कावरे ओम सुर्यवंशीयांचा सहभाग होता.सांघीक दुहेरी मध्ये प्रियंका हंगरगेकर यश हुंडेकरी यांनी रजत पदक पटकावले. तसेच प्रियंका हंगरगेकर व यश हुंडेकरी यांची मोहाली पंजाब येथे होणाऱ्या सिनीयर महाराष्ट्र संघात निवड झाली. या यशस्वी खेळाडूचे राज्य अध्यक्ष सुनिल पूर्णपाञे जिल्हाअध्यक्ष संदीप गंगणे सचिव,सिराज शेख  वप्रशिक्षक संजय नांगरे यांनी अभिनंदन केले. 

 
Top