धाराशिव (प्रतिनिधी)- ओमराजे निंबाळकर यांना जनतेतुन मिळत असलेल्या प्रेम पाहुन विजयाची गँरटी आहे. ही टेम्पररी कंपनीची परमनंट गँरटी नाही तर परमनंट कंपनीची परमनंट गँरटी असल्याचे मत दिलीपराव सोपल यानी व्यक्त केले. महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ वैराग येथील आयोजीत प्रचार सभेत ते बोलत होते.

यावेळी सोपल म्हणाले की, खासदार कसा असावा, त्याचे काम कसे असते हे ओमराजे यानी दाखवुन दिले आहे. बाकीचे फक्त आश्वासन देतात, पण ओमराजे हे करुन दाखवतात. विरोधी पक्षाचे नेत्यांच्या डोळ्यात त्यांनी अंजन घातले आहे. ओमराजेच्या सभेसाठी लोक पदरमोड करुन येत असल्याचे दिसत आहे, यावरुन त्यांच्या विजयाची गँरटी आहे. विशेष म्हणजे लोक त्यांच्या सभेतच येत नाहीत, तर त्याना निवडणुकीसाठी देणगी देत असल्याचे सांगुन सोपल यांनी स्वतःआलेला अनुभव देखील सांगितला. एक दुसरीत शिकणाऱ्या मुलीने स्वतःच्या खाऊसाठी जमविलेले पैशाचा गल्ला सोपल यांच्याकडे सुपुर्त केल्याचे त्यानी सांगितले. ही देणगी ओमराजेकडे पोहचवा अस मला त्या मुलीने सांगितले, असे प्रेम मिळायला खरोखर भाग्य लागते, त्यामुळे ओमराजे तुम्ही भाग्यवंत आहात अशीही प्रशंसा सोपल यानी यावेळी केली. या तालुक्याचे प्रेम तुम्ही कमविले असुन एवढ प्रेम या अगोदर कोणत्याही खासदाराला मिळाले नसल्याचे सोपल यानी सांगितले.


 
Top