कळंब (प्रतिनिधी)- तालुक्यातील पाथर्डी येथे ग्रामपंचायत कार्यालयाने ग्रामसभा न बोलवताच नवीन ग्रामदक्षता कमिटीची नेमणूक आपल्या सोयीने केल्याने ग्राम पंचायत  महिला सदस्य यांनी थेट तहसीलदाराकडे धाव घेऊन नवीन ग्राम दक्षता कमिटी रद्द करावी अशी मागणी केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिकृत असे की पाथर्डी ग्रामपंचायत कार्यालय यांनी दिनांक 25 ऑगस्ट 2021 रोजी ग्रामपंचायत कार्यालय पाथर्डी यांनी ग्रामसभेत ग्रामदक्षता कमिटीची नेमणूक शासन निर्णय नुसार गटित केलेली दिसून येत नाही. यात अनेक प्रकारच्या त्रुटी आढळून आलेल्या आहेत यात विरोधी ग्रामपंचायत सदस्य यांना विचारात न घेता विरोधी पक्ष सदस्य नेमणे त्याचप्रमाणे अनुसूचित जाती प्रतिनिधी ना समितीत न घेणे सामाजिक कार्यकर्ते विश्वासात न घेता अनेकांची नेमणूक करणे व तत्कालीन तलाठी यांच्या परस्पर ग्रामसभा घेणे या व अशा अनेक बाबी या बोगस पद्धतीने आढळून येत असल्यातरी नवीन ग्रामदक्षता कमिटी ही तहसीलदार यांनी बरखास्त करण्याचे आदेश तात्काळ द्यावेत अशी मागणी महिला सदस्य दैवशाला विठ्ठल सावंत मोनिका बालाजी पिंगळे यांनी तहसीलदाराकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.  या निवेदनामुळे कळंब परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.  

 
Top