तुळजापूर -

श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती धाराशिव येथे मिरवणूक मध्ये पोलिसांकडून शिवभक्तावर लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शंभूराजे प्रेमीनी शनिवार दि. १८ रोजी सकाळी ११.३० वा जुन्या बसस्थानक समोरील चौकात रस्ता रोको आंदोलन केले. 

धारशिव येथे छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या जयंती मिरवणुकीमध्ये अमानुषपणे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांनी लाठीचार्ज करून हिंदू प्रेमींच्या भावना दुखावल्याचा निषेध करुन दोषीवर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. 

 आंदोलनात  स्वराज्य  संघटना जिल्हाध्यक्ष  महेश  गवळी, ॲड. गिरीश लोहारेकर, प्रशांत सोंजी, अजय सांळुके, संतोष भोरे, विशाल साळुंके, अक्षय साळवे, प्रशांत कदम सोंजी, अनिल हंगरगेकर, सुदर्शन वाघमारे,दिनेश धनके, बालाजी जाधव, परीक्षित साळुंके, गणेश पाटील, कुमार टोले, सत्यजित साठे, अण्णा क्षीरसागर यांच्यासह शंभूप्रेमी उपस्थित होते. 

 
Top