कळंब     -  कळंब येथील भगवंत विठ्ठल मंदिरात भगवंत जयंती (प्रगट दिन) निमित्त नामसंकीर्तन  महोत्सवाचे  दिनांक १८ मे ते  २१  मे या कालावधीत  आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त काकडा आरती ,भजन, किर्तन ,ज्ञानेश्वरी पारायण आदी  कार्यक्रम संपन्न होत आहेत   

 दिनांक १८ मे  व  दिनांक १९ मे    ह .भ. प. स्वानंद बेदरकर  यांचे व्याख्यान, आयोजक (युवक आघाडी कळंब ) दिनांक २० मे रोजी भगवंत जयंती समयी पहाटे महेश आप्पा मुंडे व श्रीकिशन मुंडे यांच्या हस्ते भगवंताची महापूजा होईल. प्रसाद महाराज सहस्रबुद्धे यांचे किर्तन पहाटे ४ ते ५  या वेळेत होईल. २० मे रोजी श्रीधर बुवा रामदासी, दिनांक २१  मे रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत श्रीराम श्रीधर बुवा रामदासी यांचे काल्याचे किर्तन होईल. पुष्पलता गौतम माने ,किरण माने  यांच्या स्मरणार्थ गिरीष माने यांची दुपारी महापंगत होईल. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रशेखर बारटक्के, ज्ञानेश्वर बारटक्के ,प्रकाश मोरे, विलास मिटकरी, पांडुरंग माळवदे, मुरलीधर चोंदे परिश्रम घेत आहेत.भगवंत जयंती उत्सव सोहळ्यात भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन मंदिराचे पुजारी हभप जीवन महाराज रत्नपारखी यांनी केले आहे.

 
Top