तुळजापूर (प्रतिनिधी) -तिर्थक्षेञ  तुळजापूर येथील लातुर रस्त्यावर असणाऱ्या नवीन बसस्थानक मधील ऐक हजार लिटरचा अँरो  प्लँट  बंद असल्याने सध्या कडक उन्हाळ्यात यातील गरम पाणी पिवुन  सर्वसामान्य भाविक प्रवाशांन आपली तहान भागवावी लागत असल्याने भाविकांन मधुन तीव्र नाराजी व्यक्त होता आहे. सदरील अँरो प्लँट थंडपाणी? विक्रेत्यांचा धंदासाठी तर बंद ठेवला नाही ना असा सवाल प्रवाशांमधुन केला जात आहे. थंड शुध्द पाण्याची यंञणा उपलब्ध असताना ती यंञणा बंद ठेवल्यामुळे एसटीचा ढीसाळपणा उघडकीस आल्याचे बोलले जात आहे.

तिर्थक्षेञ तुळजापूरात सध्या  दररोज लाखो संखेने भाविक येत आहेत. यात सर्वसामान्य भाविकांची संख्या लक्षणीय आहे. सध्या  41 अंश सेल्सियस वर तापमान गेले आहे. त्यामुळे प्रवाशांना सतत तहान लागत  असल्याने लातुर रोडवरील नवीन बसस्थानकात बालाजी अमाईन्स कंपनी तर्फ एक हजार लिटरचा अरो प्लाँट बसवला आहे. माञ हा अँरो प्लाँटचा पाणी शुध्दीकरण व थंड करण्याची प्रक्रिया गेली अनेक महिन्या पासुन बंद आहे. बसस्थानकावर रोज हजारो थंडपाणी बाँटल विकले जात आहे. सध्या बोअर पाणीपाईप कनेक्शन नादुस्त अँरो प्लँटला जोडुन पाणी शुध्द, थंड न होता थेट गरम पाणी प्रवाशांना पिवुन तहान भागवावी लागत आहे. पाणी गरम असल्याने न पिता थंड पाणी बाँटल विकत घेवुन सर्वसामान्य आपली तहान भागवत आहेत. त्यामुळे भाविक, प्रवाशांना पाण्यासाठी अर्थिक झळ सोसावी लागत आहे.


 
Top