तुळजापूर (प्रतिनिधी) -महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना दर महिन्याच्या सात तारखेला वेतन केले जाते. ते नऊ तारीख होवुन ही न झाल्याने शुक्रवार दि. 10 मे रोजी साजरा केला जाणारा सण एसटी कर्मचाऱ्यांना उधारीवर साजरी करण्याची वेळ आली आहे. नेते निवडणुकीत मस्त असुन एसटी कर्मचारी माञ अर्थिक संकटाने ञस्त  झाल्याचा आरोप एसटी कर्मचाऱ्यांमधुन केला जात आहे.

अक्षय तृतीया सारखा महत्त्वाच्या सणाचा तोंडावर एसटी कर्मचारी सण साजरा करण्यासाठी लोककडे हातउसने मागुन उधारीवर सण साजरा करण्याची वेळ एसटी कर्मचाऱ्यांनावर आल्या ने कर्मचारी वर्गात नाराजी व्यक्त केली जात आहे. संप व कोरोनापासून वेळेवर वेतन मिळालेले नाही. संपानंतर न्यायालयात दिलेल्या आश्वासनानुसार सात तारीख उलटली तरीही दहा तारखेपर्यंत वेतन मिळते. या महिन्यात मात्र दहा तारखेपर्यंत वेतन मिळेल की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे.

एकीकडे वेतनाला व खर्चाला कमी पडणारी रक्कम एसटीला दर महिन्याला देऊ, असे लेखी आश्वासन दीर्घकालीन संपानंतर शासनाने नेमलेल्या तीनसदस्यीय समितीने उच्च न्यायालयात दिले होते. कर्मचारी वेळेवर पगारी होत नसल्याने एसटी कर्मचारी अर्थिक विवंचना आणि डिप्रेशनमध्ये राहत आहे. याचा परिणाम त्याच्या आरोग्यावर, कुटुंबीयावर व एसटीमधील सेवेत होत असतो. राज्यातील जवळपास ऐंशी हजार अधिकारी, कर्मचारी वर्गाचा पगार ऐन लोकसभा निवडणुक रणधुमाळीत वेळेवर होत नसल्याने सत्ताधारी बाबतीत कर्मचारी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे.


 
Top