तुळजापूर (प्रतिनिधी)-  समतेचे महानायक महात्मा बसवेश्वर यांची 919 वी जयंती येथील वीरशैव जंगम मठ येथे काँग्रेस चे जेष्ट नेते  आप्पासाहेब पाटील. विशाल रोचकरी. रणजीत इंगळे. लालासाहेब मगर यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येवुन साजरी करण्यात आली

यावेळी गुरुनाथ बडूरे यांनी महात्मा  बसवेश्वर यांच्या जीवन कार्या विषयी व  त्या काळात अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा, कर्मकांड, समाजातील वाईट चालीरीती याविषयी त्यांनी जनजागृती करून सर्व समाजात समतेचा संदेश दिल्याचे सांगितले. यावेळी वीरशैव सभा जिल्हाअध्यक्ष प्रफुल्लकुमार अण्णा शेटे, गौरीशंकर साखरे, श्रीकांत नाडापुडे, अरुण नडमने,  प्रफुल मस्के, महादेव तोडकरी, विश्वनाथ शेटे, महाबळेश्वर तोडकरी, भारत कोप्पा, सचिन ताकमोघ, .नागनाथ गिराम. अनुप मस्के, निलेश बचाटे, कैलास मस्के, रवी बचाटे, ओंकार काटकर, प्रवीण नाडापुडे, सुहास साखरे, महेश नडमने, राहुल साखरे, महादेव बडूरे, ओंकार मस्के, राजू धरणे, सुहास कानडे, अजिंक्य आडसकर, धीरज देशमाने, श्रीशैल पाटील,  प्रसाद वाले, विक्रम बचाट, वीरभद्र बडूर, ओंकार साडेगावकर, सौ अस्मिता शेटे, दीपाताई मस्के, वैशाली धरणे, अंजली साबळे, राजश्री धरणे, अमृता बचाटे, सारिका बडूरे, संजीवनी तोडकरी, विजया शेटे, इंदुमती तोडकरी, वैशाली बडूरे, प्रियंका मस्के आदी उपस्थित होते. 

महात्मा बसवेश्वर चौकात माजी नगरसेवक अमर मगर, रामचंद्र रोचकरी, विशाल रोचकरी, राजेश शिंदे यांच्या हस्ते नाम फलकाचे पूजन करण्यात आले. यावेळी  समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील तहसिल  कार्यालय, नगरपरिषद, पंचायत समिती सह विविध शासकीय कार्यालयात व विविध संस्थेत महात्मा  बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.


 
Top