तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील नादुंरी येथील हरणी नदी काठी असणाऱ्या वाळलेले झाडेझुडपे यांना अचानक आग लागली. हि आग वाढत  झोपडपट्टीकडे सरकत असताना नगरपरिषद तुळजापूर अग्निशमन वाहनाने तिथे तात्काळ पोहचुन आग विझवली. यामुळे झोपडपट्टीला आग लागण्यापासुन वाचल्याने संभाव्य मोठे अर्थिक नुकसान टळले.

या बाबतीत अधिक माहिती अशी की, नादुंरी येथे शनिवार दि. 4 मे रोजी दुपारी दोन वाजता नागणे डीपी पासुन अचानक आग लागली. सध्या वाळलेले बेशरम सह झाडामुळे नदी काठासह पुढेपुढे एक हजार फुटच्या आसपास आग पुढे सरकु लागली. नादुंरी सरपंचाने तुळजापूर नगरपरिषद अग्नीशमन दलास फोन करताच फायरमन देविदास देवकर व सहकारी तिथे पोहचले. वाढत जाणारी आग विझवली. यामुळे गावालगत झोपडीपट्टीकडे सरकणारी आग लोळ, थांबल्याने पुढील अनर्थ टळला.


 
Top