तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर येथील भवानी रोडवर लावण्यात आलेले डिझीटल बँनर प्रचार कालावधी संपुनही तसेच राहिल्याने आर्दश आचार संहितेचा भंग झाल्या प्रकरणी संबंधितावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी अमोल जाधव यांनी निवडणुक निर्णय अधिकारी यांना तक्रार देवुन केली आहे.

धाराशिव लोकसभा मतदार संघाची निवडणुक दिनांक 07 मे 2024 रोजी होत असुन, दिनांक 05 मे 2024 रोजी सायंकाळी 05:00 वाजता संपलेली असताना, तुळजापूर येथील भवानी रोड चोपदार पान सेंटर, श्री छत्रपती शिवाजी महाराच चौक येथील नगर परिषद कॉम्प्लेक्स येथे महायुतीचे उमेदवार  सौ. अर्चनाताई पाटील यांचे प्रचाराचे होल्डींग रात्री 7:52 वाजेपर्यंत लावण्यात आलेले होते. सदर होल्डींग काढण्याबाबत मी नगर परिषदेचे मुख्याधिकारी लक्ष्मण

कुंभार यांना सायंकाळी 6:06 मी. वाजल्यापासुन वारंवार फोन करून सदर होल्डींग काढण्यास सांगत होतो. परंतु मुख्याधिकारी किंवा नगर परिषद कार्यालय तुळजापूर येथील कोणत्याही अधिकारी अथवा कर्मचारी यांना सदर होल्डींग काढलेले नव्हते. नगर परिषदेने सदर होल्डींग हे रात्री 7 : 52 वाजता काढले. त्यामुळे संबंधितांवर आचार संहितेचा भंग केलेला असुन त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.


 
Top