कळंब  (प्रतिनिधी)-कळंब ते येरमाळा राष्ट्रीय महामार्गावरील कन्हेरवाडी पाटी जवळ अंदाजे 700 ते 800 मीटर रस्त्याचे काम काही अंतर्गत वादामुळे रखडलेला होता. या रस्त्याच्या अर्धवट कामामुळे या महामार्गावर आजपर्यंत 20 ते 25 व्यक्ती अपघातात मरण पावली आहेत.  या ठिकाणी दररोज अपघात होतात या अपघातामुळे अनेक कुटुंबातील कर्त्या माणसाला जीव गमवावा लागला. तर काही जनांना कायमचे अपंगत्व आले आहे. आता राहिलेल्या अर्धवट रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी आता धाराशिव पोलीस यंत्रणेसह रस्ते विकास महामंडळ व मेघा कंपनी ही जोरात कामाला लागली आहे.  

अशी माहिती मिळाली आहे. या रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. या मागणीला धाराशिवचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह कळंब पोलीस निरीक्षक रवि सानप यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे लवकरच अर्धवट रस्ता पूर्ण होण्याच्या अशा निर्माण झाल्या आहेत. या राष्ट्रीय महामार्गाचे 2016 ते 2017 मध्ये काम हाती घेण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे शंभर फूट रस्ता असलेली नोंद असून, हा मार्ग रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरित केल्यानंतर जेवढे हस्तांतर झाले. तेवढ्या जागेवर रस्ता करण्यात आला आहे. परंतु कन्हेरवाडी पाटीवर काही अंतर्गत वादामुळे रस्त्याचे काम अडवण्यात आले होते. या अर्धवट रस्त्याच्या कामासाठी कन्हेरवाडी ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच ॲड.जाधव यांनी अनेकवेळा रस्ते विकास महामंडळ आणि मेघा कंपनीच्या अधिकाऱ्यांना भेट व निवेदन देऊन प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी,पोलीस प्रशासन, रस्ते विकास महामंडळ अधिकारी आणि रस्ता आढवणाऱ्या मध्ये नुकतीच बैठक झाली होती. त्यामुळे रखडलेल्या अर्धवट रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. अशी माहिती कळंब पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवी सानप या रस्त्याच्या संदर्भात माहिती दिली आहे.  दहा ते पंधरा दिवसात या रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. 


जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो

आंदोरा, कन्हेरवाडी,मस्सा (खं) व इतर ग्रामस्थांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा पोलिस निरीक्षक रवि सानप व्यक्त केली. तसेच या रस्त्याचे काम एका बाजूने पूर्ण झाले असले तरी दुसऱ्या बाजूला रस्त्याचे काम अर्धवट राहिले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी मातीचे ढिगारे टाकण्यात आल्यामुळे रात्री अपरात्री या ठिकाणी अनेक गुन्हे चोऱ्या लुटमारी होत असून इतर प्रवाशांना आपला जीव  मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. 

 
Top