तुळजापूर (प्रतिनिधी) - तालुक्यातील सलगरा दिवटी प्राथमिक केंद्रात मनमानी कारभार कर्मचारी गैरहजर पित्याने केली मलमपट्टी या मथळ्या खाली  .सलगरा आरोग्य केंद्रातील मनमानीचा पदाफार्श  केला होता. याची दखल तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी संबधित कर्मचाऱ्यांनी तात्काळ खुलासा करावा अशी नोटीस पाठवली आहे. त्यामुळे खुलासा काय येतो याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, तुळजापूर यांनी  वैद्यकीय अधिकारी प्रा. आ. केंद्र सलगरा दि. ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना पाठवलेल्या नोटीसीत म्हटले आहे की,  26/05/2024 रोजीच्या दैनिकांमध्ये “सलगरा आरोग्य केंद्रात मनमानी कारभार, कर्मचारी गैरहजर, पित्याने केली मलमपट्टी“ या मथळयाखाली आलेल्या बातमीचा खुलासा सादर करावा. कारण आपल्या प्राथमीक आरोग्य केंद्राबाबत “सलगरा आरोग्य केंद्रात मनमानी कारभार, कर्मचारी गैरहजर, पित्याने केली मलमपट्टी” या मथळ्याखाली बातमी आलेली आहे. तरी सदर बाब अत्यंत गंभीर असून, सदर बातमीच्या अनुषंगाने मुद्देनिहाय व वस्तुनिष्ठ स्वयंस्पष्ट लेखी खुलासा हे पत्र प्राप्त होताच तात्काळ सादर करावा. खुलासा असमाधानकारक असल्यास व वेळेत प्राप्त न झाल्यास, आपले नाव पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव वरिष्ठ कार्यालयास प्रस्तावित केले जाईल. याची गांभीर्याने नोंद घ्यावी व यापुढे अशा प्रकारची घटना आपल्या आरोग्य संस्थेत होणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घ्यावी. असे नोटीसीत म्हटले आहे.

 
Top