कळंब (प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी असून उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदार संघाचे घड्याळ चिन्ह घेऊन उभा असलेले अजित पवार गटाचे उमेदवार अर्चना ताई पाटील यांच्या प्रचारार्थ एका सभेमध्ये मा. खासदार 

गायकवाड यांनी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावतील व जाती धर्मात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केले आहे. तसेच त्या वक्तव्यामुळे जाती धर्मा च्या नावावर मते मागता येत नाही याची पूर्ण कल्पना असताना देखील जाणून बुजुन धर्माच्या नावाने मते मागण्याचा काम प्रा.रवींद्र गायकवाड यांनी घड्याळ चिन्ह करीता केलेलं आहे. जे की आदर्श आचारसंहिता याचे उल्लंघन आहे. तरी त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सकल मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली. यावेळी शहरातील मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.


 
Top