धाराशिव (प्रतिनिधी)-रग्बी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने व पुणे जिल्हा रग्बी असोसिएशन यांच्या सहकार्याने पुणे (बालेवाडी) येथे 31 में ते 03 जुन रोजी राज्यस्तरीय रग्बी स्पर्धा होणार असुन या स्पर्धेत सिनीयर मुले-मुली व ज्युनिअर मुले-मुली सहभागी होऊ शकतात.सिनियर मुलां-मुलींसाठी 2006 च्या आतील जन्मतारीख असणारे खेळाडू सहभाग घेऊ शकतात. व ज्युनिअर मुलां-मुलीसांठी 2007, 2008, 2009 जन्म तारीख असणारे खेळाडू सहभागी होऊ शकतात. यासाठी दिनांक 11 मे  वार शनिवार रोजी तालुका क्रीडा संकुल कळंब जिल्हा धाराशिव. येथे जिल्हास्तरीय अजिंक्यपद स्पर्धा होणार असुन व यातुनच जिल्ह्याचा संघ निवडला जाणार असुन सदरील स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या संघाने  व खेळाडूंनी 11 मे रोजी सकाळी ठिक  9.00 वाजता किट मध्ये उपस्थित रहावे .असे आव्हान जिल्हा रग्बी संघटनेचे अध्यक्ष  शरद गव्हार  व  सचिव विशाल नलावडे यांनी केले आहे.


 
Top