धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील दुधाळवाडी येथे दि. 11 व 12 मे या कालावधीत पंचगव्य उत्पादनांचे दोन दिवसीय मोफत प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती गोसेवक वैद्य नवनाथ दुधाळ यांनी दिली.

सदरील शिबिरामध्ये पंचगव्यापासून साबण, दंतमंजन, धूपबत्ती, अंगराग पावडर, गोमय भस्म,  पंचगव्य घृत, जलअमृत, बाम, केशतेल, शाम्पू यासह दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या वस्तू कशा बनविता येतात याचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचबरोबर कोरोना सारख्या महामारी, कॅन्सर, डायबिटीस यांसारख्या आजारावर कशी मात करता येऊ शकते याबाबत मोफत मार्गदर्शन व सल्ला देण्यात येईल. तसेच रुग्ण सुद्धा सल्ला घेण्यासाठी आपले रिपोर्ट घेऊन येऊ शकतात. सदरील प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी वैद्य नवनाथ दुधाळ यांच्याशी 9969313397 किंवा 9975684354 या क्रमांकावर नोंदणी करावी. रोजगार निर्मितीसाठी अथवा स्वतःचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी वयाची किंवा शिक्षणाची अट नाही. सदरील शिबिर हे दुधाळवाडी (हरणवाडी), ता. कळंब, जि. धाराशिव येथे होणार असून जास्तीत जास्त इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही वैद्य नवनाथ दुधाळ यांनी केले आहे.


 
Top