तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर  शहरात पुजारीवृंदाचे मतदान लक्षणीय असुन, हा मतदार शहराचे मताधिक्य ठरवणारा असल्याने या पुजारीवृंदाचे मतदान कुणाचे पारड्यात पडणार याची उत्सुकता आहे. तुळजापूर शहराची लोकसंख्या चाळीस हजारच्या आसपास असुन 25 हजार मतदार आहे.

तिर्थक्षेञ तुळजापूरचे राजकारण पुजारी वृदांच्या जीवावर चालते. येथील पुजारीवृंद श्रीतुळजाभवानी मंदिराशी निगडीत असल्याने आपल्या मुलभुत गरजा म्हणजे पाणी, स्वछता, मंदिरातील समस्या, जो पक्ष नेता सोडवतो त्याचा पाठीमागे खंबीरपणे उभा राहतो. पुजारी वृंदाची माफक अपेक्षा  काय तर आपल्या भाविकाला  मंदिरात सन्मानजनक वागणूक मिळावी व त्यांना मुलभुत सुविधा मिळावी ऐवढीच आहे. तिर्थक्षेञ तुळजापूर वरच्या राजकारणाचा प्रभाव हा पंचक्रोषीत असणाऱ्या पंचवीस खेड्यावर राहत असल्याने जो तुळजापूर वर सत्ता गाजवतो तो तालुक्यावर राज्य करु शकतो. पुजारी मतदार पैशाच्या लालची नाही. एखाद्याच्या पाठीशी उभारला तर तो तनमनधनाने त्याचा पाठीशी खंबीर पणे उभा राहतो. हा पुजारी वर्गाचा आजपर्यतचा इतिहास आहे.

तिर्थक्षेञ तुळजापूर शहरावर शेकापचे आमदार कै. माणिकराव खपले हे पुजारी वर्गातील असल्याने शेकापने पन्नास वर्ष राज्य तुळजापूर शहारावर केले. तिर्थक्षेञ तुळजापूर ही धार्मिक नगरी असताना सत्ता माञ डाव्या विचारसरणी असलेल्या शेकापची होती हे विशेष आहे. माजी आमदार माणिकराव खपले यांच्या निधनानंतर शहराचे राजकारण बदलले. पुजारी मतदार विखरला गेला. अनेक पर्याय त्यांनी केले पण त्यांच्या पसतीस एकही पर्याय उभारला नाही.

आज पुजारी वर्ग तिर्थक्षेञी पाणीपुरवठा, स्वछता, अतिक्रमण मुक्त रस्त,  विकास कामांचा दर्जा व सुरक्षितता याला प्राधान्य देणार असल्याचे सोशल मिडीयावर चाललल्या  चर्चवरुन दिसुन येत. आज शहरात महिलांसाठी स्वछतागृह, शौचालय नाही हे तिर्थक्षेञ तुळजापूरचे दुर्देव आहे. व्यसनाधिनता वाढली आहे. शहरातील जुन्या व मंदीर परिसराचा विकास झाला नाही याचा ञास  भाविकांसह शहरवासियांना सहन करावा लागत आहे. आजचा शहराचा मतदार हुशार झाला आहे. सर्व बाजूंचा विचार करुन तो मतदार करणार आहे. सध्या शहरातील मतदार मतदाना बाबतीत चुपी साधत उघडपणे बोलण्यास तयार नाही. त्यामुळे मतदारांचा कल दिसुन येत नाही. शहरात सध्या सत्ताधारी, विरोधक एकमेंकाचे उणेधुणे काढत आहे. यातुन विकास कामांची चर्चा होत आहे. आज शहराला तीन दिवसाआड पाणी येत आहे. याचीही चर्चा सोशल मिडीयिवर चर्चिली जात आहे. सध्या शहरात महायुती, महाविकास आघाडीचा प्रचार तोडीस तोड होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरवासिय कुणाचा पारड्यात आपले मतदान टाकणार,हे मतमोजणी नंतरच कळणार आहे.


 
Top