तुळजापूर (प्रतिनिधी)- निवडणुक ड्युटीला आलेले परराज्य व परजिल्हयातील पोलिस अधिकारी, कर्मचारी रविवारी सकाळी प्रथम श्रीतुळजाभवानी मंदिरात जावुन श्रीतुळजाभवानी दर्शन मनोभावे घेवुन मग निवडणुक ड्युटीस रवाना झाले.

मंगळवार दि. 7 मे रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी शनिवारी संध्याकाळी सीआरएसएफचे शंभर जवान तसेच एसटी महामंडळ बसेसमधुन  नाशीकचे 350, यवतमाळ 250, पोलिस अधिकारी कर्मचारी होमगार्ड व जिल्हयातुन मोठ्या संखेने पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड तुळजापूर शहरात दाखल झाले. पोलिस सकुंल येथे विश्रांतीसाठी गेले. रविवारी सकाळी यातील बहुतांशी अधिकारी, कर्मचारी थेट सकाळी श्रीतुळजाभवानी मंदीरात आले होते. त्यामुळे सकाळी पोलिस मंडळीची दर्शनार्थ गर्दी दिसत होती. पोलिस ड्रेसमध्ये आले कि त्यांना थेट दर्शनार्थ सोडले जात असल्याने बहुतांशी पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी मंदिरात ड्रेसवर येवुन दर्शनानंतर  मंदिरात  फोटो व आपल्या सहकार्यासमावेत सेल्फी काढत होते. परत थेट निवडणुक ड्युटीवर रवाना झाले. 


आई, वडील, पत्नी आग्रहाखातीर देवीदर्शन 

निवडणुक ड्युटीस तुळजापूरला जाणार असल्याचे घरी सांगताच आइ, वडील, पत्नी यांनी आवर्जून वेळ  काढुन देवीदर्शन करुनच परत गावी या म्हणल्यानेच आधी देवीदर्शन घेतले. मंदिरात देवदर्शनार्थ गेलो याचा फोटो काढुन पुरावा मोबाईल मध्ये घेतला. नंतर इलेक्शन ड्युटीवर गेल्याची माहिती नाशिक जिल्हयातील विलास जाधव या कर्मचाऱ्याने दिली. 
Top