धाराशिव (प्रतिनिधी)-रूपामाता उद्योग समूह धाराशिव च्या वतीने डाळिंब ता. उमरगा येथील श्री रविशंकर विद्या मंदिर चा विद्यार्थी चि. समर्थ मनोज कोळगे याने इ. 10 मध्ये 92% मार्क घेऊन विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल रूपामाताचे संस्थापक- अध्यक्ष  अँड. व्यंकटराव गुंड यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. पालकांनी आपल्या मुलांची सतत संवाद साधला पाहिजे व विद्यार्थ्यांनी पालकांच्या कष्टाची जाण ठेवत त्यांची स्वप्न पूर्ण पुर्ण केली पाहिजेत अशा अपेक्षा   अँड. गुंड यांनी व्यक्त केली. यावेळी दाळींब येथील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कोळगे, शाम चिंचोळे, राहुल मोरे, काशीनाथ भोसले, बालाजी जाधव यांच्यासह  सहकारी उपस्थित होते.

 
Top