भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील वालवड येथे आज  रोजी दहावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आला.नुकताच इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झालेला होता. त्यामध्ये वालवड येथील जिल्हा परिषद शाळेचा शंभर टक्के निकाल लागलेला होता. संख्यात्मक नाही तर गुनात्मकही निकाल यावेळेस चांगला लागला होता. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय वालवड यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी त्यांचे पालक व शिक्षकांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

94.80% गुण घेऊन ओव्हळकर रोहित रामा विद्यार्थी प्रथम आला होता तर तांबोळी सानिया रियाज 93.40% गुण घेऊन द्वितीय आलेली आहे तसेच भरत 90.20 टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक संपादित केलेला आहे तर गोरे ऋतुजा बापू 89.7 टक्के गुण घेऊन चतुर्थ आलेले आहे तसेच काशीद सोमनाथ 89 टक्के गुण घेऊन पाचवा क्रमांक संपादित केलेला आहे तर इंग्लिश स्कूलच्या साक्षी सुरेश देवळकर हिने 93.20% गुण घेतलेले होते. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार कार्यक्रमांमध्ये उपसरपंच कृष्णा मोहिते यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत शाळेला ज्याही वेळेस गरज लागेल ते सर्वत्र सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी दिले तर गटनेते प्रवीण खटाळ यांनी विद्यार्थ्यांनी ज्याप्रमाणे आता दहावीत यश संपादित केले आहे त्याप्रमाणे येणाऱ्या काळातही यश संपादन करून गावचे नाव रोशन करावे ही अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग देवळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन संदीप पाटील यांनी केले. यावेळी निवृत्त मेजर बाबू पवार साहेब, निवृत्त बांधकाम अभियंते शंकर मोहिते साहेब, ग्रामपंचायत सदस्य उमेश मोहिते, आश्रु लोखंडे, भारत पाटोळे, सोसायटीचे चेअरमन दीपक टिपे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास पाटील व सदस्य, ग्रामविकास अधिकारी मुकुंद लवटे, शिक्षक वृंद, विद्यार्थी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top