धाराशिव (प्रतिनिधी) - विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांची जयंती धाराशिव शहरात ठिकठिकाणी विविध उपक्रमांनी दि. 23 मे रोजी साजरी करण्यात आली. दरम्यान शहरातून काढण्यात आलेल्या रॅली दरम्यान युद्ध नको, बुद्ध हवा यांसह विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

धाराशिव शहरातील तथागत गौतम बुद्ध व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस धुप, दीप व पुष्प अर्पण करून त्रिशरण पंचशील व गाथा पठण करण्यात आले. शहरातून रॅली काढण्यात आली.  यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे वरिष्ठ केंद्रीय शिक्षक पी एम वाघमारे गुरुजी, जिल्हाध्यक्षा विजयमाला धावारे, जिल्हा सरचिटणीस विद्यानंद वाघमारे, जिल्हा कोषाध्यक्ष राजश्रीताई कदम, माजी नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, तालुका पर्यटन उपाध्यक्ष स्वामीराव चंदनशिवे, तालुका पर्यटन सचिव धनंजय वाघमारे, समता सैनिक दलाचे सचिन दीलपाक, स्वराज्य जानराव, पुष्पकांत माळाळे, धनंजय शिंगाडे, बाबासाहेब कांबळे, कबीर बनसोडे, विद्यानंद बनसोडे, मुकेश मोठे, भिख्खू संघाचे संघनायक भन्ते विजय बनसोडे, उमाजी गायकवाड, बापू जावळे, अमोल अंकुश, श्रेयस बनसोडे, प्रज्योत सिरसाठे, विश्वदीप बनसोडे, हर्षदीप बनसोडे, प्रनिक गायकवाड, विपुल गायकवाड, अनिकेत कदम आदींसह मुले, मुली, महीला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 
Top