धाराशिव (प्रतिनिधी) - छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त लाटी हल्ला करणाऱ्या विभागीय पोलीस अधिकारी राठोड व इतर कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे दि.24 मे रोजी केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले की, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती दरम्यान धाराशिव शहरातील इंगळे गल्ली परिसरातील शंभूभक्तांनी मिरवणूक काढली होती. मिरवणूक सुरू असताना शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवार व पोलीस कर्मचारी स्वामी तेथे आले व त्यांनी डीजे फोडला. त्यानंतर पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्निल राठोड यांनी छत्रपती संभाजी महाराज जयंती मंडळाच्या कार्यकर्त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत छत्रपती संभाजी महाराजांच्या मावळ्यांवर विनाकारण अमानुष लाठी हल्ला केला. या लाठी हल्ल्यामध्ये मंडळाचे बरेच कार्यकर्ते जखमी झाले असताना देखील प्रशासनाने त्यांच्यावरतीच खोटे गुन्हे दाखल केले. या जयंती मिरवणुकीवर लाठी हल्ला करून हिंदू समाजाच्या भावना दुखावणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकारी राठोड, पोलीस निरीक्षक पवार, स्वामी व इतर पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ 10 दिवसांच्या आतमध्ये बडतर्फ करण्यात यावे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघाचे जिल्हाध्यक्ष मोहन मुंडे यांनी दिला आहे. यावर पप्पू देशमुख, सुरेश शेरकर, यश हंचाटे, गणेश लावंड, अजय उंबरे, प्रथमेश पडवळ, सुजित उंबरे, विजय उंबरे, अजित उंबरे, महेश लावंड, मयुर वंडरे, सोहम मस्के, प्रवणराज शेरकर, करण शेरकर, निखिल मते, निखिल इंगळे, आशिष मोरे, धीरज शेरकर, गणेश लोहार, योगेश ढोबळे, अजिंक्य मोरे, विवेक मुंडे, दिनेश बारकुल आदींच्या सह्या आहेत.

 
Top