तुळजापूर (प्रतिनिधी) -तालुक्यात उस्मानाबाद लोकसभेसाठी 65.40 टक्के मतदान शांततेत पार पडले. धनेगाव पांगरदरवाडी येथील ग्रामस्थांनी बहिष्कार मागे घेतल्याने येथे मतदान प्रक्रिया पार पडली. माञ तालुक्यातील इटकळसह परिसरातील जवळपास सहा ते सात गावातील मतदान यंत्र व कर्मचाऱ्यांना घेऊन धाराशिवकडे निघालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये बिघाड झाल्याने प्रशासनाची एकच धावपळ उडाली

ही घटना मंगळवारी (दि.7) रात्री 9 वाजेच्या सुमारास तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथे मतदान यंञे, कर्मचारी घेऊन उस्मानाबादकडे निघालेली बस मंगरूळ गावाजवळ पोहचली असता अचानक गरम होऊन बंद पडत इंजिनमधून मोठ्या प्रमाणात धूर निघू लागला. यामुळे बसमधील मतदान प्रक्रीयेतील कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. परंतु, चालकाने प्रसंगावधान दाखवत तत्काळ बस बंद करत इंजिनवर पाणी मारले. धूर कमी झाला तरी बस सुरू होण्यास अडचण निर्माण होऊ लागली. त्यानंतर अर्धातासाच्या प्रयत्नानंतर अखेर 9.30 वाजता बस सुरू झाली व पुढे मार्गस्थ झाली. याबाबत तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत अधिक माहिती घेऊन बोलतो असे सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, इटकळसह परिसरातील गावातील मतदान यंत्र व कर्मचाऱ्यांना घेऊन मंगळवारी सायंकाळी एसटी महामंडळाची बस क्र. एमएच 14

बीटी 2032 ही मंगरुळ मार्गे तुळजापूरच्या दिशेने निघाली होती.


धनेगाव ग्रामस्थांचा बहिष्कार मागे

तुळजापूर तालुक्यातील मौज धनेगाव ग्रामस्थांनी पुर्नवसनासाठी बहिष्कार टाकला होता. येथे प्रशासनातील अधिकारी व पोलिस पाटील यांच्या मध्यस्थीं नंतर बहिष्कार मागे घेतल्यानंतर 2014  नंतर दहा वर्षांनी उत्साहात व शांततेत मतदान पार पडले. येथे एकुण 358 पैकी जवळपास 261 मतदारांनी मतदान केले. येथे 72.90 टक्के मतदान झाले.



48 तासानंतर दारु दुकानांवर मद्य प्रेमीची झुंबड

लोकसभा निवडणुक पार्श्वभूमीवर रविवार, दि. 5 रोजी सांयकाळी पाच वाजता दारु दुकाने बंद होते ते मतदान होताच मंगळवार दि. 7 मे  रोजी सांयकाळी सहा वाजता खुली होताच श्रम परिहारासाठी दारु घेण्यासाठी दारु दुकानांवर मद्य प्रेमीचि एकच गर्दी झाली होती.


 
Top