तुळजापूर (प्रतिनिधी)  - येथे माहिती अधिकार अधिनियम कायदा या विषयावर जन जागृती च्या उद्देशाने कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

यात  प्रमुख मार्गदर्शक म्हणून माहिती अधिकार अधिनियम आणि ग्राहक संरक्षण कायदा या विषयात प्रामुख्याने काम करणारे आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत संघटक, देवगिरी प्रांत संपतराव जळके यांनी नवीन माहिती अधिकार कायदा यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

प्रमुख मार्गदर्शक यांचे स्वागत सोमवार गिरी मठाचे अधिपती महंत इच्छागिरी महाराज यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन नारायण गिर मठ ट्रस्ट, तुळजापूर व युवा जागृती मण्डल, तुळजापूर यांनी केले होते. या कार्यक्रमाला तुळजापूर शहरातील जागरूक नागरिक, अनेक वकील, विद्यार्थी, समाजसेवक, निवृत्त शिक्षक कर्मचारी असे विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूरज लोंढे यांनी केले तर आभार ऋषिकेश साळुंखे यांनी मांडले.


 
Top