तुळजापूर (प्रतिनिधी) -  उस्मानाबाद  लोकसभा मतदारसंघासाठी तुळजापूर विधानसभा मतदार संघातुन मंगळवार दि. 7 मे  रोजी सकाळी 7 ते सांयकाळी 6 या कालावधीत तालुक्यातील नेत्यांनी व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

मतदान केंद्रावर महायुती, महाविकास आघाडी समर्थक मोठ्या संखेने ठाण मांडुन होते. शहरास पंचक्रोषीतील मतदान केंद्रावर माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, युवा नेते विनोद गंगणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सूर्यवंशी, शहराध्यक्ष महेश चोपदार, सेनेचे बापुसाहेब भोसले, तर महाविकास आघाडीकडुन काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, युवा काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष अमर मगर, युवा नेते रुषी मगर, अमोल कुतवळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अमर चोपदार, शिवसेनेच्या शामल पवार, सुधीर कदम, शाम पवार आदी मतदान केंद्रांना भेटी देवुन सतत पाहणी करीत होते. मुस्लीम बहुल भागात गावांमध्ये मोठ्या संखेने मतदान झाले. कडक उन्हातही मतदार मतदानाला आले. शहरात नगरपरिषद येथे आर्दश सखी व दिव्यांग मतदान केंद्र कार्यान्वित होते.


 
Top