धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्हा परिषद प्रथमिक शाळा अळणीचे विद्यार्थी बालाजी जयराज कदम यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने त्याच्या आई वडिलांसाह सत्कार करण्यात आला. 

प्रास्ताविकात मुख्याध्याक बशीर तांबोळी यांनी या स्पर्धेच्या युगात कठीण परिश्रमाशिवाय पर्याय नाही. परिश्रम केले तर यश हमखास मिळते असे सांगितले. तसेच सत्कार मूर्ती बालाजी कदम यांनीही मुलांना स्पर्धा परीक्षेबद्दल माहिती दिली व विद्यार्थ्यांना मी कठोर परिश्रम केले. रोज दहा तास अभ्यास म्हणून मला यश मिळाले असे सांगितले. यावेळी बालाजी कदम यांच्या वर्गशिक्षक श्रीमती वर्षा डोंगरे यांनीही आपले विचार व्यक्त केले. यावेळी विजयकुमार नांदे,विनोद लावंड, शामबापू लावंड,रामराजे वीर, श्रीपाल वीर, भाऊसाहेब वीर, धवलसिंह लावंड, अक्षय कदम, सोपान काका कोरे, धर्मराज सूर्यवंशी, जयश्री कदम, बाबासाहेब कदम,लक्ष्मीबाई कदम,साहेबराव कदम, समाधान कदम, जनक कदम,केरबा कदम, युवराज पौळ, दीपक कदम सूत्रसंचालन श्रीमती सत्यशीला म्हेत्रे यांनी केले. तर आभार क्रांती मते यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीटीसाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.


 
Top