धाराशिव (प्रतिनिधी)- पर्यटन जनजागृती संस्था धाराशिव संचलित पर्यटन विकास समितीच्या वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित जागेत आकर्षक अशा बुध्द गुफा देखाव्यास भेट दिली. तथागत गौतम बुद्ध यांना वदन केले. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

 फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने अंकुश उबाळे,धनंजय वाघमारे,संजय गजधने, प्रविण जगताप,बलभीम कांबळे,संपतराव शिंदे यांनी पर्यटन विकास समितीचे अध्यक्ष युवराज नळे,रणजीत रणदिवे,बाबा गुळीग,राजाभाऊ कारंडे,प्रकाश झरकर,राजेंद्र अत्रे तसेच टायगर सेनेचे प्रभाकर लोंढे, श्री सरवदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. रणजीत रणदिवे यांनी आकर्षक अशा बुध्द गुफा देखाव्यातील तथागताच्या ध्यानस्थ बसलेल्या भुमी स्पर्श मुर्तीबद्दल म्हटले की,गौतम बुद्ध ध्यानस्थ आहेत. त्यांचा एक हाथ मांडीवर व दुसरा हात भुमीकडे आहे. यातुन बुध्द हेच सांगतात की, ही भुमी,पृथ्वीच एकमेव सत्य आहे बाकी सर्व हवा हवाच आहे. पर्यटन समितीचे अध्यक्ष युवराज नळे यांनी म्हटले की,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांचे विचार जगाला प्रेरणादायी ठरतात असे मत व्यक्त करत त्यांनी स्वलिखीत गायलेले भीमाचा सैनिक बन या गीताचे स्मरण केले.गणेश रानबा वाघमारे यांनी आभार व्यक्त केले.


 
Top