कळंब (प्रतिनिधी )-कळंब तालुक्यातील मौजे रायगाव्हण येथील शेतकऱ्यांने नंबर बांधावरचा रस्ता अडविल्यामुळे दि.23 एप्रिल पासून उपविभागीय महसूल अधिकारी यांच्या कार्यालयासमोर अबालवृद्धांसह आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा उत्रेश्वर खिचडे, हरिभाऊ खिचडे यांनी प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, कळंब तालुक्यातील मौजे जायफळ येथील मुळचे रहिवासी असलेले उत्रेश्वर सोमनाथ खिचडे, आणि हरिभाऊ धोंडीराम खिचडे यांची रायगाव्हण शिवारातील गट नंबर 73 मध्ये जमीन आहे. सदरील शेतकऱ्यांची जमीन ही सर्व्हे नंबर 36 मध्ये आहे. या सर्व्हे नंबर मधील नंबर 74 आणि गट 65 यांच्या नंबर बांधावरून जाण्यासाठी रस्ता आहे. मागच्या चार पिढ्यांपासून निवेदनकर्ते शेतकरी याच नंबर बांधावरून ये जा करतात. मात्र गतवर्षी गट नंबर 74 जमीन संजीव भास्कर भिसे यांना विकली गेली. अन्‌‍ तेंव्हा पासून आमचा रस्ता आडविला जात आहे. आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हा शेतीवरच चालतो. त्यामुळे शेतात गुरेढोरे घेऊन जाण्यासाठी, शेतीची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टर ने आन करावे लागते. सदरील रस्ता आडविल्यमुळे आम्हाला आमची शेती कसने आवघड झाले आहे. एक वर्षापूर्वी आम्ही कळंब तहसील कार्यालयात सदरील रस्त्याचा प्रश्न तात्काळ सोडवाव म्हणून निवेदनही दिले आहे. मात्र या प्रकरणाचा निकाल अद्याप पर्यंत लागला नाही. संजीव भिसे यांचे वडील भास्कर भिसे हे एक वर्षांपासून रस्ता अडवून त्रास देत आहेत. म्हणून भास्कर भिसे यांच्या त्रासाला कंटाळून दि.23 एप्रिल 2024रोजी मंगळवार पासून कुटुंबातील महिला, लहान मुले आणि वृद्धांसह सर्वजण आमरण उपोषणाला बसणार आहोत. उपोषणामुळे कुटुंबातील कुठल्याही सदस्यांचे काही बरे वाईट झाले तर याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनावर राहील. असे निवेदनात म्हटले आहे.

सदरील निवेदनाच्या माहितीस्तव प्रत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री धाराशिव, जिल्हाधिकारी धाराशिव, पोलीस अधीक्षक  धाराशिव, उपविभागीय महसूल अधिकारी कळंब, तहसीलदार कळंब, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिराढोण यांना देण्यात आल्या आहेत.


 
Top