कळंब (प्रतिनिधी)-   प्रति वर्षाप्रमाणे कसबा पेठ कळंब येथील श्रीराम मंदिरात श्री प्रभू रामचंद्र यांचा जन्मोत्सव रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त सकाळी श्री प्रभू रामचंद्र सीतामाई व बंधू लक्ष्मण यांच्या मूर्तींची अभिषेक पूजा संपन्न झाली. यानंतर प्रसिद्ध कीर्तनकार श्रीराम जोशी केज यांनी श्री राम जन्माची कथा कीर्तन सेवा द्वारे सांगितली व दुपारी 12 वाजून 21 मिनिटांनी राम जन्म उत्सव साजरा करण्यात आला. उपस्थित पुरुष, महिला भक्तांनी फुले व गुलालची टाकला. यानंतर श्रीराम जन्माचा पाळणा व महाआरती संपन्न झाली.

जोशी परिवाराच्यावतीने सरबत वाटप करण्यात आले दिनांक 18 एप्रिल रोजी दुपारी महाप्रसाद व संध्याकाळी सहा वाजता श्रीराम पालखी मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिराचे पुजारी प्रकाश हरदास,सतीश हरदास, सुभाष हरदास, सुनील देशमुख, खंडेराव देशमुख, महेश जोशी, बबनराव वाघमारे, मकरंद पाटील ,पांडुरंग गुरव, सारंग हरदास ,सचिन हरदास ,सुभाष पोरे बाळासाहेब पत्की ,राजाभाऊ कोळपे ,मुकुंद देशमुख, यांनी परिश्रम घेतले.


 
Top