कळंब (प्रतिनिधी) - इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) चे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन चेन्नई येथे दि 13 व 14 रोजी तामिळनाडू राज्य शाखेतर्फे आयोजित करण्यात आले होते. यासाठी संपूर्ण देशभरातून 400 पेक्षा जास्त राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्यांनी सहभाग घेतला. 

यावेळी असोसिएशनच्या हेल्थ मॅनिफेस्टोचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यामधील सर्व मुद्दांवर सविस्तर चर्चा होऊन तो सर्वानुमते पारित कण्यात आला. यामध्ये सर्वासाठी आरोग्य ही संकल्पना गल्ली ते दिल्ली पर्यंत यशस्वीपणे राबविणे, राईट टु हेल्थ आमलात आणणे, डॉक्टर्स व हॉस्पिटल वरिल वाढते हल्ले रोखण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर कडक कायदा करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करणे, आरोग्य विषयक उपकरणांवरील कर आकारणी सरसकट कमी करून ती न्युनतम पातळी म्हणजेच 3% करणे, वैद्यकीय शिक्षणाचे शेक्षणिक शुल्क कमी करण्यासाठी राष्ट्रीय कोअर कमीटी गठीत करून वैद्यकीय शैक्षणिक शुल्क सर्व सामान्यांना परवडणारे ठरविले जावे, स्त्रीभृणहत्या विरोधी कायद्याअंतर्गत ( पीसीपीएनडीटी) सुधारणा करून फॉर्म भरणे, रेकॉर्ड ठेवणे ई बाबीना वगळून कायदा अपडेट करणे, ग्राहक संरक्षण कायद्यातून (सी पी ए) डॉक्टर्स व हॉस्पिटलांना वगळावे इ बाबिंचा समावेश आहे. 

यावेळी केंद्रीय पदाधिकारी डॉ आर व्ही अशोकन (राष्ट्रीय अध्यक्ष), डॉ अनिल कुमार नायक (सरचिटणीस) आणि सदस्यांनी भाग घेतला. यामध्ये मुंबई चे डॉ शिवकुमार उत्तरे (उपाध्यक्ष), डॉ अनिल पाचणेकर (माजी उपाध्यक्ष) डॉ. जयेश लेले (माजी सरचिटणीस). नागपूरचे डॉ. अशोक आढाव (माजी राष्ट्रीय अध्यक्ष), डॉ वाय एस देशपांडे, डॉ मिलिंद नाईक. पुणे येथील डॉ जयंत नवरंगे, डॉ संजय पाटील, डॉ प्रकाश मराठे, डॉ पद्मा अय्यर. डॉ रामकृष्ण लोंढे ( उस्मानाबाद- धाराशिव), डॉ राजेंद्र गांधी, यशवंत गाडे, (औरंगाबाद), डॉ संतोष कुलकर्णी (कुर्डुवाडी), डॉ संतोष खडतरे (अकलूज), डॉ राजेंद्र कुलकर्णी ( नाशिक) यांचा समावेश होता.


 
Top