धाराशिव (प्रतिनिधी) - शहरातील जिजाऊ चौक येथील स्वयंवर मंगल कार्यालयात 2 ते 8 एप्रिल या कालावधीत आयोजित संत गोरोबा काका संगीतमय चरित्रकथा व संत साहित्य संमेलनात गौरीनंदन गोशाळेचा गो सेवक म्हणून श्री सुरेश चंद्रकांत करपे व महानंदा सुरेश करपे यांच्या प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

धाराशिव शहरात एमआयडीसी परिसरात गौरीनंदन गोशाळेची स्थापना करण्यात आलेली असून या माध्यमातून गोवंश संवर्धन आणि जतन करण्याचे काम केले जात आहे. विविध सामाजिक कार्यक्रमांद्वारे गोवंश, आपल्या देशाची संस्कृती याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. संत गोरोबा काका संगीतमय चरित्रकथा व संत साहित्य संमेलनात पहिल्या दिवशी गौरीनंदन गोशाळेच्या वतीने गोसंवर्धन करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. 

गोशाळेच्या या कार्याची दखल घेऊन संत गोरोबा काका संगीतमय चरित्रकथा व संत साहित्य संमेलनात गौरीनंदन गोशाळेचा गो सेवक म्हणून सुरेश चंद्रकांत करपे व महानंदा सुरेश करपे यांच्या प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी कथा प्रवक्ते ह.भ.प गुरुवर्य दीपक खरात, गौरीनंदन गोशाळेचे अध्यक्ष गिरीष करपे, उपाध्यक्ष मनोज अंजिरखाने, सदस्य संकेत सूर्यवंशी, अनंत वाघमारे, शिवलिंग गुळवे, राहुल काकडे, सुजित साळुंके, राज नवले, सलमान शेख,क्षितिज चव्हाण, बंडू देवकते, राज गुरव, मनोज गोरे, श्रीकांत दिवटे, राम पेंढारकर, धीरज पतंगे, योगीराज मोरे आदींसह कार्यक्रमाचे संयोजक व  गोभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top