तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील नगरसेवक कै. विश्वास काका इंगळे विचार मंच इफ्तार पार्टी तर्फ सामाजिक कार्यकते तथा नगरसेवक रणजित इंगळे व आनंद मालक जगताप यांच्या वतीने शुक्रवार दि. 5 मार्च रोजी  जामा मस्जिद येथे जर वर्षी प्रमाणे याही वर्षी इफ्तारी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या इफ्तारी पार्टीत शेकडो हिंदू-मुस्लीम बांधव एकत्र बसून या पवित्र रमजान महिन्याचा उपास (रोजा) सोडण्यात आला.

याप्रसंगी रणजित इंगळे, आनंद जगताप, अमर मगर, जनसेवक अमित कुतवळ, सुनिल रोचकरी, अभिजीत कदम, गणेश अणदुरकर, दत्ता हुंडेकरी रसुल बागवान, युसूब शेख, श्रीकांत बापू धुमाळ, कालिदास चिवंचिवे, दत्ता हंगरगेकर, संतोष काका इंगळे,  रईस सिद्दिकी, फिरोज पठाण, रसूल बागवान, गौस बागवान, तोफिक शेख, मुसा नदाब मतीन बागवान, मोसिन खान, समीर हारकरे, बबलू सय्यद, जफर शेख, अफसर शेख, गुलजार खान, आरिफ बागवान, मोसिन बागवान, आशु बाबा शेख, कै विश्वास काका इंगळे विचार मंचचे पदाधिकारी, सदस्य, हिंदू व  मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top