तुळजापूर (प्रतिनिधी)- आदर्श आचार संहितेचे पालन करीत सामाजिक उपक्रमाचे आयोजन करुन  महामानव  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्याचे आवाहन पोलीस निरक्षक रविद्र खांडेकर यांनी केले. पोलिस स्टेशन येथे बुधवार दि. 3 मार्च रोजी घेण्यात आलेल्या शांतता समिती  बैठकीत केले.

उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी  तुळजापूर  व रवींद्र खांडेकर यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. यावेळी बोलताना पोलिस निरीक्षक खांडेकर म्हणाले कि, महामानव  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती ही लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कालावधीत येत असल्याने या उत्सवात पक्ष ध्वज, उमेदवार यांचे नावे न येवु देता  आदर्श आचारसंहितेचे पालन करून  साजरी करा. मिरवणूका पारंपारिक वाद्यांचा गजरात काढा. यातील वाद्यांचा आवाज 75 डिसीबल पेक्षा अधिक जावु नये याची दक्षता घ्या, दुष्काळी परिस्थिती असल्याने पाणपोया उघडा, सामाजिक सांस्कृतिक क्रिडा ऊपक्रम करा, महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रित अशी जयंती साजरी करण्याचे आवाहन यावेळी केले.

या प्रसंगी  संतोष पाटील नायब तहसीलदार, विवेक सूर्यवंशी उपकार्यकारी अभियंता एमएसईबी, वैभव पाठक ओ एस नगरपरिषद, डॉ. अविनाश ढगे उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर इत्यादी उपस्थित होते. तसेच तुळजापूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाचे पदाधिकारी अनंत पांडागळे,  औदुंबर कदम, मिलिंद रोकडे, सागर कदम, प्रताप कदम, अमोल कदम, कमलेश कदम, तसेच तुळजापूर ग्रामीण भागातील अपसिंगा,बोरी सांगवी मार्डी, सिंदफळ,काक्रंबा मंगरूळ, बारूळ, भातंबरी रायखेल, इत्यादी  गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाचे शेकडो  पदाधिकारी व सदस्य हजर होते.


 
Top