तुळजापूर (प्रतिनिधी) - धाराशिव  तालुक्यातील बावी येथील धनंजय नरहरी येडाळे या शेतकऱ्यांच्या शेतातील  आंबा, चिकु, फणस, पेरु, शेवगा, झाडे जाळणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पोलिस स्टेशन ग्रामीण धाराशिव यांना तक्रार देवुन केली आहे. या प्रकरणी एनसी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनंजय नरहरी येडाळे रा. तुळजापुर ता. तुळजापुर जि. धाराशिव.येथील  रहिवाशी असुन माझी शेती मौजे बावी येथील गट नं. 293 मध्ये आंब्याच 6, चिकुचे 1, फणस 1, पेरु 1, शेवगा 8 असे झाडे होती. व ऊन जास्त असल्याकारणाने मी त्या झाडांचा बुडाला  सोयाबीनेच बुस्कट टाकले होते. कारण पाणी सोडल्यानंतर ते खुप वेळ त्या ठिकाणी राहते व मी दिनांक 04/04/2024 रोजी काल मी शेताकडे गेलो असता मी बघितले की अज्ञात इसमांनी माझे सर्व झाडे जाळुन टाकले आहेत व माझे खुप मोठया प्रमाणात कधी न भरुन येणारे नुकसान झालेले आहे. तरी  झाडे जाळणाऱ्या  अज्ञात  व्यक्तींवर  पाहणी करुन त्यांच्यावर कारवाई असे तक्रार देताच पोलिसांनी या प्रकरणी एन सी दाखल करुन चौकशी सुरु केली आहे.


 
Top