तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील मौजे खानापूर येथील डॉ.स्वरांजली महादेव धुते हिने अत्यंत गरीब परस्थितीतून एम.बी.बी.एस.परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल  इटकळ  पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करून तिचे अभिनंदन करण्यात आले. 

खानापुर येथील शेतकरी कुटुंबातील डॉ. स्वरांजली महादेव धुते हिने अंबोजोगाई येथील शासकीय महाविद्यालयातून एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण झाली.अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून आई वडील व मामांनी तिला शिक्षण घेण्यासाठी अनमोल अशी मदत केली. याचीच जाणीव ठेवत  स्वरांजली हिने एम.बी.बी.एस.परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत आई वडिलांचा विश्वास सार्थ ठरविला. याबद्दल इटकळ ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने स्वरांजली व तिच्या आई वडिलांचा  शाल, पेन, प्रभू रामचंद्र यांची प्रतिमा व पेढा भरऊन सत्कार करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी इटकळ ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनेश सलगरे,नामदेव गायकवाड,बालाजी गायकवाड यांच्यासह सरपंच सुधाकर हिप्परगे,पोलिस पाटील अमोल हिप्परगे, माजी सरपंच उत्तम धुते, माजी उपसरपंच रहीम मुजावर,धोंडीबा जोकार,शब्बीर पटेल,लक्ष्मण धुते,महादेव धुते, लल्लू माळी, नागनाथ धबाले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सत्कारा नंतर डॉ. स्वरांजली महादेव धुते यांनी इटकळ ग्रामीण पत्रकार संघाचे आभार मानले.


 
Top