तुळजापूर (प्रतिनिधी)- धाराशिव येथील पत्रकार रविंद्र केसकर यांच्यावरील भ्याड हल्याचा तिव्र निषेध करुन हल्लेखोरावर कठोर कारवाई करण्याची मागणी तुळजापूर तालुका पञकार संघाने नायब तहसिलदार संतोष पाटील यांना निवेदन देवुन केली.
तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे कि,धाराशिव येथील पत्रकार रविंद्र केसकर यांचे काल अपहरण करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्याता आला. सोमवारी रात्री धाराशिव येथे पञकार रविंद्र केसकर हे आपले कार्यालयीन कामकाज आटोपुन घरी जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना अमर पॅलेस ते साळुंके नगर, बेंबळी रोड या भागात मारहाण केली. चाकु हल्यात त्यांच्या चेहऱ्याला जखम झाली आहे. केसकर या हल्यातुन बालंबाल बचावले आहेत. मात्र हल्याचा प्रयत्न का झाला ? या मागचा सुत्रधार कोण आहे ? पत्रकारांना टाग्रेट का केले जाते ? असे प्रश्न निर्माण होत आहे. या प्रकरणाचा तपास जलद गतीने व्हावा. तुळजापूर येथील पत्रकारांच्या वतीने या हल्ल्याचा जाहीर निषेध करून असुन हल्लेखोरांवर कडक कार्यवाही करावी व पत्रकारांना संरक्षण द्यावे ही असे निवेदनात म्हटले आहे यावर पञकारांच्या स्वाक्षरी आहेत.