तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील काक्रंबा येथील माळी  गल्ली क्रिकेट  कल्ब तर्फ  महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 197 व्या जयंतीनिमित्त  आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन सोमवार दि1रोजी युवा नेते  ऋषी मगर, यांच्या शुभहस्ते प्रशांत अपराध, सरपंच कालिदास खताळ, माजी उपसरपंच अनिल बंडगर

यांची प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. 

या क्रिकेट स्पर्धेत भागातील जवळपास 32 संघांनीसहभाग नोंदवला. प्रथम विजेत्या संघास ऋषी मगर यांच्यातर्फे 25 हजार रुपये, द्वितीय संघास प्रशांत अपराध यांच्या वतीने 15 हजार तर, तृतीय संघास अमोल वाघमारे यांच्यातर्फे 8 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.या प्रसंगी  हरिदास वट्टे, महेश सुरवसे, दयानंद वाघमारे,सुजित घोगरे, सोमनाथ घोगरे, पवन वाघमारे, विकास भिसे, प्रशांत देवगुंडे, श्याम ढेरे, किसन क्षीरसागर, चेतन बंडगर, नितीन पाटील, प्रसाद मोरे, प्रशांत गरड, गजानन वाघमारे, राजू भिसे, सदाशिव क्षीरसागर, बालाजी गोडसे, रामहरी क्षीरसागर उपस्थित होते.


 
Top