कळंब (प्रतिनिधी)-  विद्याभवन हायस्कूल कळंब या प्रशालेतील नवोपक्रमशील सहशिक्षक सोपान पवार यांचे शैक्षणिक कार्य विविध शैक्षणिक उपक्रम विद्यार्थ्याच्या गुणवत्ता विकास ,राज्यस्तर जिल्हा स्तर तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य ,विविध विषयांवर  शैक्षणिक लेखन, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ पुणे बालभारती सदस्य कार्यशाळेसाठी निवड, राज्यस्तर ,जिल्हास्तर निबंध लेखन पुरस्कार प्राप्त, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये शोधनिबंध सादर, मराठी विषयाचे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना अनेक शाळेत मार्गदर्शन, साने गुरुजी कथामाला विविध उपक्रम अशा विविध शैक्षणिक उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल धाराशिव जिल्हा मुख्याध्यापक संघ धाराशिव यांच्यावतीने मातृभाषा ज्ञान गौरव पुरस्कार  मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश टेकाळे, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला धाराशिव अध्यक्ष डी के कुलकर्णी, अन्नदाते बंडोपंत दशरथ डॉ. लक्ष्मण जाधवर,सौ महानंदा  जाधवर (आदर्श माता), हभ प महादेव महाराज अडसूळ ,मराठी साहित्य परिषद मराठवाडा कार्याध्यक्ष मुख्याध्यापक परमेश्वर पालकर, माधव सिंह रजपूत,  व इतर मान्यवर यांच्या हस्ते सन्मानपत्र शाल पुष्पगुच्छ देऊन सोपान पवार यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

तसेच याप्रसंगी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद कळंब तालुका कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी संजय देवडा, डॉ गिरीश कुलकर्णी, रवी नारकर व इतर पदाधिकारी  यांच्या वतीने सोपान पवार यांचा सत्कार करण्यात आला. प्रदीप यादव, रमेश शिंदे या प्रसंगी उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. के. कुलकर्णी सर यांनी केले. तर आभार डॉ अभिजीत जाधवर यांनी मानले.


 
Top