धाराशिव (प्रतिनिधी)-लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा प्रचार शिगेला पोचला असून महायुतीचे उमेदवार अर्चना पाटील व राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर निशाणा साधत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत जिल्हाभरातील नागरिकांना मोफत उपचार केलेल्या योजनेचा बुरखा फाडला आहे. जिल्ह्यातील नागरिकांचा नेरुळ येथील तेरणा स्पेशलिटी हॉस्पीटल ॲन्ड रिसर्च सेंन्टर येथे मोफत उपचार केला आहे, अशी दिशाभूल करत महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन योजनेंतर्गत गेल्या 11 वर्षात 18 कोटी 23 लाख 71 हजार 248 रूपये घेतले आहेत. अशी घणाघाती टिका भिकार सारोळा, आरणी, सुंभा, समुद्रवाणी, कामेगाव, पळसप आदी गावांच्या गावभेटी प्रसंगी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे. 

खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या विरोधात महायुतीकडून अर्चना राणाजगजीतसिंह पाटील या निवडणूक लढवत असून निवडणूक प्रचारादरम्यान आपल्या ट्रस्टमार्फत जिल्हाभरातील नागरिकांना मोफत उपचार देत असल्याचे सांगत आहे या ट्रस्टमार्फत जिल्ह्यातील नागरिकांना मोफत उपचार दिले जातात. तर उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णांकडून आधार कार्ड व इतर आवश्यक कागदपत्रे कशासाठी घेतली जातात. असा प्रश्न केला आहे? हे ट्रस्ट एकीकडे नागरिकांना मोफत उपचार केला असल्याचे भासवत असून शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेत आहे. सन 2012 ते 2023 या 11 वर्षाच्या कालावधीमध्ये एकुण 6,797 रुग्णांना मोफत उपचारासाठी दाखल करुन घेतले असून प्रत्यक्षात 4344 रुग्णांच्या उपचाराकरीता महाराष्ट्र राज्य शासनाकडून रक्कम रु. 18 कोटी 23 लाख 71 हजार 248 रुपये एवढी रक्कम तेरणा स्पेशलिटी हॉस्पीटल ॲन्ड रिसर्च सेंन्टरच्या खात्यावरती महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत प्राप्त झाली आहे. 

प्रसंगी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षनाताई सलगर,युवासेना विभागीय सचिव अक्षय ढोबळे,डी.सी.सी चे संचालक संजय देशमुख,तालुकाप्रमुख सतीश सोमाणी, रवि कोरे आळणीकर, पांडुरंग शिंदे, परिष शिंदे, बापु हारकर, शिवयोगी चपने, शिवप्रताप कोळी, युवासेना उपजिल्हाप्रमुख निलेश शिंदे उपस्थित होते.  
Top