धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय धाराशिव येथे भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती  साजरी करण्यात आली. भारतरत्न महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पक्ष कार्यालयात पूजन करून अभिवादन करण्यात आले.

तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या हस्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पुष्पहार घालून जयंतीनिमित्त अभिवादन केले. जिल्हाध्यक्ष महेंद्र  धुरगुडे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी यांनी पक्षाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या भीम अनुयायी यांना लाडूचे वाटप केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र  धुरगुडे, प्रदेश संघटक सचिव खलील पठाण, धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड, धाराशिव शहराध्यक्ष सचिन तावडे, धाराशिव शहर कार्याध्यक्ष मनोज मुदगल, सामाजिक न्याय प्रदेश सरचिटणीस सचिन सरवदे, सामाजिक न्याय मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष विवेकानंद साळवे,सेवा दल सेल जिल्हाध्यक्ष सतीश घोडेराव, माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, महिला जिल्हा कार्याध्यक्ष अप्सरा पठाण, विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष प्रतीक माने, धाराशिव युवक शहराध्यक्ष निहाल शेख,धाराशिव महिला शहराध्यक्ष सुलोचना जाधव, सामाजिक न्याय जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ जानराव,अल्पसंख्यांक धाराशिव शहराध्यक्ष अरफात काझी,धाराशिव महिला तालुका कार्याध्यक्ष सुरेखा चव्हाण, रुक्मिणी कुंभार,धाराशिव महिला तालुका उपाध्यक्ष उषा लगाडे, धाराशिव तालुका संघटक कलीम शेख, धाराशिव शहर सचिव सुजित बारकुल, आंबेजवळगा जि.प.गटप्रमुख सुरेश राठोड, लतिफ शेख, मसाजी शेंडगे, अज्जू शेख तसेच महामानवास अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी उपस्थित होते.


 
Top