धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या हस्ते सामाजिक न्याय विभाग धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी मसाजी नामदेव शेंडगे तर वाघोली गाव महिला शाखा अध्यक्षपदी अज्जू बाबा शेख यांची नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यतत्पर जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या हस्ते आणि प्रमुख नेते यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय धाराशिव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी यांची नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. नवनियुक्त पदाधिकारी यांनी पक्षाने दिलेल्या संधीचे सोने करू असे यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्यासोबत प्रदेश संघटक सचिव खलील पठाण, धाराशिव शहराध्यक्ष सचिन तावडे, धाराशिव शहर कार्याध्यक्ष मनोज मुदगल, सामाजिक न्याय प्रदेश सरचिटणीस सचिन सरवदे, सामाजिक न्याय मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष विवेकानंद साळवे,सेवा दल सेल जिल्हाध्यक्ष सतीश घोडेराव, माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, महिला जिल्हा कार्याध्यक्ष अप्सरा पठाण, विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष प्रतीक माने, धाराशिव युवक शहराध्यक्ष निहाल शेख,धाराशिव महिला शहराध्यक्ष सुलोचना जाधव, सामाजिक न्याय जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ जानराव, अल्पसंख्यांक धाराशिव शहराध्यक्ष अरफात काझी,धाराशिव महिला तालुका कार्याध्यक्ष सुरेखा चव्हाण, रुक्मिणी कुंभार,धाराशिव महिला तालुका उपाध्यक्ष उषा लगाडे, धाराशिव तालुका संघटक कलीम शेख, आंबेजवळगा जि.प.गटप्रमुख सुरेश राठोड, लतिफ शेख तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी उपस्थित होते.