तुळजापूर (प्रतिनिधी)-  धाराशिव लोकसभा मतदार संघासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांना  महायुतीकडून उमेदवारी जाहीर होताच महायुतीच्या कार्यकत्यांनी छञपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.

मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अर्चनाताई पाटील यांचा प्रवेश झाला. त्यानंतर लगेचच धाराशिव लोकसभेसाठी त्यांची वर्णी लागली आहे. त्यांनी मागील अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदच्या माध्यमातून ग्रामीण भागात विविध विकास कामे केली आहेत. तसेच लेडीज क्लबच्या माध्यमातून देखील महिलांचे मोठे संघटन निर्माण केले आहे. राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात भरीव कामे करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात अर्चनाताई पाटील यांना यश आले आहे. यावेळी जनता पक्षाचे युवा नेते विनोद गंगणे, तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, विक्रमसिंह देशमुख, आदेश कोळी, वसंत वडगावे, नरेश अमृतराव, विलास राठोड, दीपक आलूरे, सचिन रोचकरी, आनंद कंदले, दयानंद मुडके, सह भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.


 
Top